sakal
महाराष्ट्र बातम्या

Shrigonda News:देवदैठणमध्ये दुरंगी लढत, सरपंचपद महिला प्रवर्गाला राखीव असल्याने वाढली चुरस

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्ग राखीव असल्याने चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदासाठी माजी सरपंच जयश्री विश्‍वास गुंजाळ आणि सुनीता दादाभाऊ वाघमारे यांच्यामध्ये संघर्ष पहायला मिळणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Grampanchayat Election: देवदैठण, ता. २७ : श्रीगोंदे तालुक्यातील मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी देवदैठण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्ग राखीव असल्याने चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदासाठी माजी सरपंच जयश्री विश्‍वास गुंजाळ आणि सुनीता दादाभाऊ वाघमारे यांच्यामध्ये संघर्ष पहायला मिळणार आहे.

सत्ताधारी संत निंबराज महाराज युवा शक्ती पॅनल आणि विरोधी संत निंबराज महाराज ग्रामपरिवर्तन पॅनलमध्ये लढत होणार असून, प्रचाराचा नारळ आज रविवारी शक्तिप्रदर्शनात होणार आहे. आमदार बबनराव पाचपुते यांना मानणारा मोठा वर्ग इथे असल्याने अनेक वर्ष पाचपुते गटाची एकहाती सत्ता ग्रामपंचायतमध्ये राहिली आहे.

माजी आमदार राहुल जगताप समर्थक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण ऊर्फ अतुल लोखंडे यांच्यापुढे सत्ता परिवर्तनाचे आव्हान आहे. जयश्री गुंजाळ यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा आणि तरुणाचा मोठा प्रतिसादही त्यांचे जमेची बाजू आहे. दुसरीकडे सोधा राजकारणाचा फायदा उठवत लोखंडे यांनी कट्टर पाचपुते समर्थक सुनीता वाघमारे यांना उमेदवारी देऊन सत्ताधारी पॅनलला धक्का दिला आहे.

ओबीसी मतांची संख्या मोठी असल्याने दोन्ही बाजूंकडून सदस्य पदासाठी एकास एक उमेदवारी दिल्या आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये लोखंडे परिवाराला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.(Latest Marathi News)

संत निंबराज महाराज ग्रामपरिवर्तन पॅनलचे सुनीता दादाभाऊ वाघमारे म्हणाल्या की, " ग्रामपंचायत कारभाराचा अनुभव असल्याने निधी कसा उपलब्ध करायचा याचा अनुभव आहे. विरोधक हे विकासकामाचा आव आणत आहेत, झालेल्या कामाचा पत्रव्यवहार माझ्या काळात झाला आहे. शिक्षण, शाळा, कचरा, तरुणांना उद्योग-व्यवसाय हे व्हिजन ठेवून निवडणूक लढवीत आहे."

संत निंबराज महाराज युवा शक्ती पॅनलच्या जयश्री विश्वास गुंजाळ म्हणाल्या की, " गेल्या पाचवर्षात देवदैठण दुष्काळमुक्त केले. भरीव विकास कामाच्या जोरावर निवडणूक लढवीत आहे. येत्या पाच वर्षात महाराष्ट्रात देवदैठण मॉडेल व्हिलेज असेल." (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT