Maharashtra Politics Uday Samant statement shiv sena party should understand Shinde role politics ratnagiri
Maharashtra Politics Uday Samant statement shiv sena party should understand Shinde role politics ratnagiri Sakal
महाराष्ट्र

शिंदे यांची भूमिका पक्षाने समजून घ्यावी - उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही, अशी भूमिका शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका पक्षाने समजून घेतली पाहिजे. बंडखोर आमदारांचे गैरसमज दूर करायला हवेत. यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा, असे मतही मंत्री सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी गुवाहाटीला गेलो असे वृत्त आले होते पण आता मी रत्नागिरीतील पाली येथील घरीच असून शिवसेनेतच आहे. शिवसेनेच्या प्रतोदांनी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदांनी काढलेली नोटीस त्यात तांत्रिक बाजू समजून घ्याव्या लागतील.

त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरेल; पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे. एकनाथ शिंदे यांची सुरुवातीपासूनच नेमकी भूमिका काय आहे, हे पक्षाला किंवा पक्षप्रमुखांना समजली नाही. ती भूमिका मांडणे आवश्यक आहे. या घडामोडींविषयी माझी भूमिका शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, विनायक राऊत यांच्यापुढे बैठकीमध्ये मांडली आहे. पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेतले पाहिजे. जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. आमच्या लोकांमधील गैरसमज दूर करायला हवेत. या सगळ्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. शिवसेनेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मी पक्ष जोडणारा असून, तोडणारा नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT