महाराष्ट्र बातम्या

BMC Scam: CM शिंदेंच्या 'त्या' निर्णयानंतर ठाकरे गट मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार; उद्धव ठाकरेंनी दिली माहिती

गेले काही महिने महापालिकेतील भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरु

धनश्री ओतारी

गेले काही महिने महापालिकेतील भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  चौकशी समिती स्थापनेची घोषणा केली. दरम्यान, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी १ जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली. तसेच सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे. मुंबईला मायबाप उरलेल नाही.अशी टीका ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. (Uddhav Thackeray press conference)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नगरसेवकांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध घटनेवर भाष्य केलं. सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे. मुंबईला मायबाप उरलेल नाही. बऱ्याच दिवसानंतर नगरसेवकांशी संवाद साधला. महापालिकेत जो भ्रष्टाचार झाल्या त्या प्रकरणी १ जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे या मोर्चाच नेतृत्व करणार आहेत. अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

काही ना काही कारणानं पालिकेची उधळपट्टी सुरु आहे. मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही. मंत्र्यांना क्लिनचीट देण शिंदे सरकारकडून सुरु आहे.

पालिकेच्या तिजोरीतून अमाप पैशाची उधळपट्टी सुरु आहे. पालिकेतील पैसा खर्च होत आहे. कारण विचारायला कोणीच नाही. एफडीतून ७ ते ९ कोटी खर्च झाले.

आमची सत्ता आल की क्लिनचीटची चर्चा करु. बीएमसीतील हवे ते घोटाळे बाहेर काढा आणि घाबरत नाही. पावसाप्रमाणे निवडणुक लांबत आहेत. निवडणुका घेण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

गद्दार हे शेवटी गद्दारच राहणार. ह्यांच्या कपाळाचा गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही. नोटिस येतात म्हणून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जातात का? असा खोचक सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच यंत्रणेचा वापर करुन ठाकरे गट फोडतात. असा आरोपही ठाकरेंनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT