Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: वज्रमूठ सभा मविआची पण खरा लढा उद्धव ठाकरेंचा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा वादळी ठरण्याची शक्यता

धनश्री ओतारी

छत्रपती संभाजीनगरात आज होणारी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पण खरी लढत ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेमागचे कारणही तसेच आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह इतर प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या सभेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.

शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

अशातच सोशल मीडियावर कॅम्पेनिंग पाहता अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

वज्रमूठ सभेच्या आयोजनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी असले तरी सभेच्या यशस्वितेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून अधिक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

सभेच्या ठिकाणी स्तंभपूजन, सभेचे निमंत्रण, कामाची पाहणी, सोशल मीडियावर कॅम्पेनिंग या सर्व गोष्टींत उद्धव ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली आहे.

निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे

सोशल मीडियावर कॅम्पेनिंग पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या ट्विटर हँडेलवर वज्रमुठ सभेचे कॅम्पेनिंग खुप कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेना ट्विटर हँडेल पाहता उद्धव ठाकरेंचा मोठा फोटो दिसत आहे.

तसेच जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांचे मोठे छायाचित्र वापरले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचेही मोठे छायाचित्र आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोध पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची लहान आकारातील छायाचित्रे निमंत्रण पत्रिकेवर छापली आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाच आमदारांनी बंडखोरी करत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यातील दोघांना मंत्रिपददेखील मिळाले. त्याला उत्तर म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद याच शहरात देण्यात आले. त्यामुळे अजूनही उद्धव सेनेची संघटना कायम आहे. त्याच जाेरावर छत्रपती संभाजीनगरात वज्रमूठ सभेचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT