maharashtra politics who belongs shiv sena uddhav thackeray cm eknath shinde mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेवर वर्चस्व कोणाचं? उद्धव ठाकरेंविरोधात हा आहे शिंदेंचा गेमप्लान

शिवसेनेच्या आमदार - खासदारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करू लागले आहेत.

- दीपा कदम

मुंबई : शिवसेनेच्या आमदार - खासदारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करू लागले आहेत. शिवसेनेतील संसदीय पक्षाचे बहुमत शिंदे यांच्याकडे झुकलेले असले तरी पक्षातील प्राबल्य मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याने पक्षातील ११ नेत्यांपैकी जास्तीत जास्त नेत्यांचे समर्थन मिळवून पक्षावरच वर्चस्व सांगण्याचा शिंदे याचे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके आणि युतीच्या काळातील शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेत त्यांचे समर्थन मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांची भेट घेऊन त्यांची देखील मनधरणी केली आहे. शिवसेनेच्या नेतेपदी १३ जणांची नियुक्ती प्रतिनिधी मंडळाने केलेली आहे. त्यापैकी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती उद्घव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारात केली होती. १३ नेत्यांपैकी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे, मात्र त्यानंतरही आपण शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आनंद अडसूळ आणि रामदास कदम यांनी मात्र पक्षातून हकालपट्टी होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने शिंदे गटाला त्यांचे समर्थन असले तरी प्राबल्य दाखवण्यासाठी त्यांचा तांत्रिकदृष्टय़ा उपयोग होणार नाही.

ज्येष्ठांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधिमंडळाच्या बहुमतानुसार पक्षाचा नेता कोण हे ठरले जाते. त्याचप्रमाणे त्याच नेत्याचे पक्षावर नियंत्रण राहते. या बाबी विचारात घेता शिवसेनेच्या नेत्यांपैकी उद्धव ठाकरे यांना लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत, अनंत गिते आणि चंद्रकांत खैरे यांचा पाठिंबा आहे. शिंदे गटामध्ये रामदास कदम, आनंद अडसूळ (पक्षाचा राजीनामा) यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. गजानन किर्तीकर यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्याने त्याबाबत स्पष्टता नसली, तरी ते शिंदे गटाकडे ते जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चिंचपोकळीचा चिंतामणीही मार्गस्थ

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : गिरणा धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 30 सेंमीने उघडले गेले आहेत

SCROLL FOR NEXT