Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून अलर्ट जारी, 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकण, विदर्भासह अन्य काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. राज्याच्या अनेक भागात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्राच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकण, विदर्भासह अन्य काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे असल्याने राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावासाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर गुरुवारी (ता. ४) जोरदार सरींची शक्यता आहे, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. कोल्हापुरातील आजरा येथे येथे सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. राज्याच्या अनेक भागांत ऊन-सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका वाढला आहे. मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूरपासून रोहतक, लखनौ, बालिया, पूर्णिया, ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. यातच पाकिस्तानपासून बांगलादेशपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. गुजरात ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने किनाऱ्यालगत ढग जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर गुरुवारी जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींसह पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT