महाराष्ट्र बातम्या

पाऊस पुन्हा सक्रीय होणार, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार!

सकाळ वृत्तसेवा

ऑगस्टमध्ये राज्याच्या बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली. गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत पावसाला सुरवात झाली. हा पाऊस फारकाळ टिकला नसला, तरी पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या खरिपाला जीवदान मिळाले. पुढील आठवडाभरात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (maharashtra rain update)

सातत्याने पडणारे खंड कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मॉन्सून हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ऑगस्टमध्ये अपुऱ्या पावसाने तर चिंतेत आणखीन भर घातली आहे. आता मॉन्सूनच्या उर्वरित हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर पूर्व विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडला.

दोन आठवड्यांचा अंदाज

हवामान खात्याने पुढील दोन आठवड्यांत पडणाऱ्या पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. तर दुसऱ्या आठवड्यात ३ ते ९ सप्टेंबर या दरम्यान उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

पुण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी दिवसभर श्रावणसरी हजेरी लावत होत्या. पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहणार असले तरीही पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता ५१ ते ७५ टक्के असल्याची खात्यातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT