Maharashtra Rain Update IMD Issue 5 day Heavy rain Alert Mumbai pune weather updates  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Alert : पुढील ४-५ दिवस पावसाचे! राज्यात मुंबई-पुण्यासह 'या' भागात कोसळणार मुसळधार

रोहित कणसे

राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्याप समाधनकारक पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत. यादरम्यान हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात बहुतांश भागात येत्या ५ दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पावसाच्या शक्यतेदरम्यान राज्यात मुंबईसह तब्बल १७ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

राज्यातील काही भागात मान्सूनने दमदार हजेरी लवली मात्र राज्यात अनेक ठिकणी पेरणीपुरता देखील पाऊस झाला नाही. दरम्यान मागील आठवडाभरापासून राज्यातील काही भागात पावसाने उसंत घेतली होती.त्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस जोरदार पावसाटी शक्यता आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. तर विदर्भातही ऑरेंज अलर्ट, पुण्यात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरात बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते. साताऱ्यात घाट परिसरात बुधवार ते शुक्रवार ऑरेंज अॅलर्ट, तर कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढणार

मुंबई काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रात्री देखील अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्याच देखील पाहायला मिळालं.

आज सकाळी देखील मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईच्या विविध भागात पाणी साचले. मुंबई विमानतळाच्या वाकोला गेट नंबर आठ परिसरा देखील सततच्या पावसामुळे पाणी साचले असून यामुळे या परिसरात नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर आणखीच वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT