Pune and Mumbai weather news esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update: पुणे, मुंबईत धो-धो बरसतोय, काळजी घ्या!...राज्यात आणखी कुठ बरसणार? IMD चा अलर्ट जारी

Rain in Maharashtra Pune and Mumbai weather news : पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, मध्यरात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

Sandip Kapde

मुंबई आणि पुणे शहरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. नवी मुंबईत काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे.

पुण्यात ऑरेंज अलर्ट-

पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, मध्यरात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने उद्यापासून (गुरुवार) तीन दिवस पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. आज बुधवारी (ता. ३१) पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या सरी तर शहर परिसरात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जुलैमधील पावसाची स्थिती-

पुण्यात गेल्या गुरुवारी २४ तासांत ११४.१ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर पाच दिवसांत पावसाचा जोर कमी झाला असून, या चार दिवसांमध्ये ७६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. प्रत्यक्षात सरासरीच्या तुलनेत यंदा २८६.८ मिलिमीटर पाऊस जास्त पडला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुणे जिल्ह्यात १ ते ३० जुलै दरम्यान सरासरी ३००.६ मिलिमीटर पाऊस पडतो, परंतु यंदा ५९४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील इतर भागांमध्ये पावसाची स्थिती-

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मुंबई, कोकण घाटमाथा तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. यामुळे या भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत पावसाची स्थिती-

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, आज सकाळी आणि मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT