कोकण 
महाराष्ट्र बातम्या

पुढील 24 तासांत कोकणसह मध्य महाराष्ट्रात धुंवाधार

येत्या २४ तासांत राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

येत्या २४ तासांत राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

रत्नागिरी - मागील २४ तासपासून राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह काही प्रदेशात पाऊस सुरु आहे. दरम्यान अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांमुळे पुन्हा एकदा राज्यातील काही प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासांत राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने या प्रदेशातील नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान भारतीय हवामाव खात्याकडून राज्यातील पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट तर मुंबई, ठाणे, पुणेसह कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात येलो अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यानच्या काळात किनारपट्टीवरील मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यात सतत गेले काही दिवस पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे नुकसान होत आहे. परिणामी शेतकऱ्याला रब्बी पिकांची चिंता लागली आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गेले काही दिवस दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही प्रदेशात येलो आणि काही भागात ओरेंज अर्लटचा हवामान खात्याने इशारा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT