Maharashtra Rain Update sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain: विजांच्या कडकडाटासह पाऊस, जाणून घ्या कुठं कसं आहे वातावरण? 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain Updates: दरम्यान गेले काही दिवस पाऊस नसल्याने राज्यात सर्वत्र उन आणि उकाड्याने लोक हैरान झाले होते. पण कालच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

आशुतोष मसगौंडे

यंदा राज्यातील जवळपास सर्वच भागांत समाधानकारक पाऊस झाल्या असून, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आशात राज्यातील अनेक ठिकाणी काल पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावत पुनरागमन केले.

यानंतर आजही राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह हवामान विभागाने इशारा (येलो अलर्ट) हवामान दिला आहे.

दरम्यान गेले काही दिवस पाऊस नसल्याने राज्यात सर्वत्र उन आणि उकाड्याने लोक हैरान झाले होते. पण कालच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जाहीर केले आहे की बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात, विशेषत: बांगलादेशालगतच्या भागात कमी दाबाची पट्टा कायम आहे. या हवामानाच्या घटनेमुळे वातावरणीय स्थितीत लक्षणीय बदल होत आहेत, ज्यामध्ये पृष्ठभागावरील परिभ्रमणाचा विस्तार आणि कोकणापासून दक्षिण-पूर्व अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या कुंडाची निर्मिती यांचा समावेश आहे, ज्याचा परिणाम दक्षिण आणि उत्तर कर्नाटकच्या शेजारील भागांवर झाला आहे.

पुण्यात मुसळधार

दरम्यान गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यामुले पुणेकर उन आणि उकाडा आशा दोन्ही समस्यांशी झुंजत होते. मात्र, काल सायंकाळी सुमारे दोन तास झालेल्या दमदार पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान शेजारच्या पिंपरी-चिंचवडमध्येही या काळावधीत विजांच्या कडकडाटास पाऊस पडला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Horoscope 2026 : मेष ते मीन राशीपर्यंत..! 2026 वर्ष तुमच्यासाठी कसे असेल? वाचा नव्या वर्षाचं संपूर्ण वार्षिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

PCMC Election: अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या पक्षाची एन्ट्री होणार? निवडणुकीसाठी नवा डाव टाकला

Solapur News : "पोलिसात दाखल गुन्ह्यातील सर्वाधिक गुन्हे हे दारूचे"- पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे!

SCROLL FOR NEXT