Maharashtra Rain Live Update esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Updates : ठाणे, पालघर अन् रायगडला आजही रेड अलर्ट!

रोहित कणसे

Maharashtra Monsoon Update : कोकण, विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले असून मुंबई जवळच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना आज (२१ जुलै) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टी होण्याच्या शक्यतेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे, रायगड आणि पलघर येथील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

तसेच या जिल्ह्यातील नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी, तसेच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबई शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असून 21 जुलै रोजी मुंबई आणि आजूबाजूला गेल्या 12 तासात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. परिसरात गेल्या 24 तासात फारसा पाऊस झालेला नाही.

दरम्यान मुंबई जवळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला असून येथे शुक्रवारी देखील पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि लागून असलेला मध्यप्रदेशचा काही भाग पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे, रायगड, गोवा आणि कारवार येथे देखील हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच या भागात पुढील दोन ते तीन मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पावसामुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून राज्यात पुढील ३ दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात देखील पुढील चार दिवस जोरदार पाऊस कोसळेल असा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पालघर, ठाणे, मुंबई, सातारा आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले असून अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 125 घरांचे नुकसान झाले असून 2,200 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईपासून 80 किमी अंतरावर असलेल्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. याठिकाणी बचावकार्य अजूनही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Money: काळा पैसा भारतात माघारी येणार! केवळ पंधरा दिवसांचा अवधी, परदेशी संपत्तीबाबत सरकारचं मोठं पाऊल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्’'च्या हॉरर-कॉमेडीची भव्य झलक, टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

SSC HSC Supplementary Exams : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून सुरू

IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?

महाराष्ट्राचा लाडक्या इन्फ्लुएन्सरसोबत कृष्णाईच्या लेकी’चा विशेष उपक्रम; प्रेमाची सुंदर कहाणी प्रेक्षकांसमोर येणार

SCROLL FOR NEXT