महाराष्ट्र बातम्या

"मुख्यमंत्री महोदय, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची आता खरी गरज"

"मुख्यमंत्री महोदय, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची आता खरी गरज" चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा Maharashtra Rains BJP Chitra Wagh slams CM Uddhav Thackeray over flood situation in Mahad Chiplun

विराज भागवत

चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई: महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर प्रचंड आहे. मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, चिपळूण, कोकण सर्वत्र हाहा:कार माजला आहे. या पावसामुळे विविध ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली आहे. नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी NDRF आणि नौदलाचे निष्णात डायव्हर्स दाखल असून विविध ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वत: घराबाहेर पडून नागरिकांना धीर द्यावा, अशी मागणी काही लोकांनी आणि नेतेमंडळींनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर खोचक टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावेळी ते स्वत: कार ड्राईव्ह करून गेले आणि त्यांनी पंढरपूरात जाऊन विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. त्यावरूनच चित्रा वाघ यांनी त्यांना टोमणा मारला. "राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का… खरी गरज आता आहे तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची मुख्यमंत्री महोदय..", अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली.

गणपतीपुळेहून 22 जणांची रेस्क्यू टीम चिपळूणला रवाना

गजानन पाटील आणि अमित गनवटकर यांनी 22 जणांची रेस्क्यू टीम चिपळूणला रवाना झाली. यामध्ये सर्व साहित्य गणपतीपुळे ग्रामपंचायतीने दिले. बोट जेट स्की चालवणारे 5 जण, सर्पमित्र 2, लाईफगार्ड 8 जणांचा समावेश आहे.

पूरग्रस्तांसाठी नौदल, NRDF ची पथके दाखल

नौदलाच्या नौसैनिकांची सुसज्ज पथके व निष्णात डायव्हर कोकण आणि रायगड परिसरात पोहोचली आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी मोठी हेलिकॉप्टरही रवाना झाली आहेत. गरज भासल्यास राज्यात अन्यत्र पूरग्रस्त ठिकाणी जाण्यासाठीही नौदलाची पथके तयार ठेवण्यात आली आहेत. नौदलाच्या पश्चिम विभागाने बचाव पथके तसेच हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी पथके महाडपर्यंत पोहोचली आहेत. पूर व पावसाच्या परिस्थितीनुसार तेथून ते पुढे जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note: भारतात प्लास्टिकच्या नोटा कधी सुरू होणार? RBI गव्हर्नरांनी 'ती' वेळच सांगितली; महत्त्वाची माहिती समोर

Numerology: न सांगताही ओळखतात मनातील भावना! लहानपणापासूनच 'सीक्रेट कीपर' असतात 'या' मूलांकाचे लोक...

सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत झळकावले होते शतक... २५६ धावांच्या खेळीत १४ षटकार, २९ चौकारांची आतषबाजी...

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

SCROLL FOR NEXT