Jayant-Patil-Emotional 
महाराष्ट्र बातम्या

"मोठी आबाळ होईल, पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही"

"मोठी आबाळ होईल, पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही" महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचा विचार करता हा कसोटीचा काळ आहे. निसर्गापुढे कोणीच मोठं नाही, अशी भावनिक खंत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. Maharashtra Govt trying all possible efforts but still people should migrate as Nature is almighty says Minister Jayant Patil

विराज भागवत

मंत्री जयंत पाटील यांची भावनिक खंत

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव्र आणि गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने कालपासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी आपली जनावरे, महत्त्वाच्या वस्तू घेऊन स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी जनतेला केले आहे. आपल्या सर्वांची मोठी आबाळ होईल. पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही, अशी भावनिक खंत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Govt trying all possible efforts but still people should migrate as Nature is almighty says Minister Jayant Patil)

कोकण, रायगड, सांगलीतही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधी, सरपंच, यंत्रणेने ताबडतोब हालचाली कराव्यात. शिवाय तेथील प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभाग धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. शिवाय प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात असल्याचा धीर मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला दिला.

एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावं. पश्चिम महाराष्ट्राने अशी अनेक संकट पाहिली आहेत. आपण या संकटालाही तोंड देऊ असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील २०१९ चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: 'गट क' परीक्षेच्या अर्जासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ! 'एमपीएससी'चा निर्णय, 2 हजार 929 पदांसाठी भरती

Vasmat Politics: गोवंश प्रकरणातील गुन्ह्यानंतर वसमतचे उपनगराध्यक्ष इमरान अली यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गने मागितली माफी! पैशांच्या बदल्यात विशिष्ट कंटेंट प्रमोट केल्याची 'मेटा'कडून कबुली?

Latest Marathi News Live Update : मूळ पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांमधील फरक तसेच त्याशी संबंधित जबाबदाऱ्यांचे स्वरूप, असे अनेक मुद्दे उपस्थित झाले - अनिल देसाई

Ajinkya Rahane: 'धोनीच्या निवृत्तीनंतर विराट-शास्त्रींनी टीम इंडियाची मानसिकता बदलली...' रहाणे स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT