CM-Uddhav-Kolhapur 
महाराष्ट्र बातम्या

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंनी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर केली घोषणा Maharashtra Rains villages those get frequently affected by Flood needs to be relocated Intime Says CM Uddhav Thackeray on Kolhapur Visit

विराज भागवत

कोल्हापूर : गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात विचित्र अशी परिस्थिती ओढवली आहे. अनेक गावं पुरामुळे उद्ध्वस्त झाली. त्यानंतर, सतत पुराचा धोका असणाऱ्या गावांबद्दल आज राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 'कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा. राज्य सरकार त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावेल. पूरग्रस्त भागाची सध्या पाहणी केली जात आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल', असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. (Maharashtra Rains villages those get frequently affected by Flood needs to be relocated Intime Says CM Uddhav Thackeray on Kolhapur Visit)

मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्त स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी 2019 चा पूर, सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.

गेल्या काही वर्षांत विविध जिल्ह्यात पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आपल्याला दिसली. अशा वेळी पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहेच. पण त्यासोबत पूरस्थितीचा सरकारने अभ्यास करायला हवा आणि त्यानंतर शासनाने तात्काळ पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: भारत-पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटचा मोर्चा

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT