organ-donation
organ-donation 
महाराष्ट्र

महाराष्ट्रात "अवयवदान'ला बाळसे 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अवयवदानाची चळवळ देशात मूळ धरत असली तरी, दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्याच्या सुविधा फक्त महानगरांमध्ये केंद्रित झाल्या आहेत. तमिळनाडूपाठोपाठ अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. यात 95 टक्के दक्षिण भारताचा वाटा आहे. 

देशात अवयवदानाबाबत वेगाने जनजागृती होत आहे. महाराष्ट्रात पुण्या-मुंबईपुरती अवयवदानाची चळवळ मर्यादित न राहता नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद या शहरांमध्येही तिचा प्रसार झाला. रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबल्यानंतर (ब्रेन डेड) अवयवदान करण्याबाबत नातेवाईक स्वतःहून रुग्णालयाकडे चौकशी करू लागले आहेत. मात्र, दान केलेले हृदय, फुफ्फुस, यकृत अशा अवयवांच्या प्रत्यारोपणाची सुविधा राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि देशात चेन्नई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, कोलकता, अहमदाबाद या महानगरांपुरती मर्यादित असल्याची खंत तज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. संजीव जाधव म्हणाले, ""महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून अवयव दानाबाबत जनजागृती वाढत आहे. त्यामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपणाची परवानगी घेणाऱ्या रुग्णालयांची संख्याही वाढत आहे; पण प्रत्यारोपण शल्यचिकित्सकांची संख्या देशभरात कमी आहे. एका शल्यचिकित्सकाला दोन ते तीन रुग्णालयांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागते. प्रत्यारोपणाची परवानगी मिळाली असली तरीही, तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या वाढण्याची सध्या गरज आहे.'' 

चेन्नईतील हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. के. आर. बालकृष्णन म्हणाले, ""सध्या फक्त मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारत अवयव प्रत्यारोपणात आघाडीवर आहेत. सुमारे 95 टक्के अवयवदान आणि प्रत्यारोपण देशाच्या या भागातून होत आहे.'' चेन्नईमध्ये हृदय, फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. महाराष्ट्रातही गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याची सुरवात झाली आहे. महाराष्ट्राने कमी वेळेत यात मोठी प्रगती केली आहे. या राज्यात अवयवदात्यांचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. 

तंत्रज्ञानामुळे "फॉलोअप' वाढला 
आधुनिक काळात स्मार्ट फोनमुळे प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाला "फॉलोअप'साठी चेन्नईला यावे लागत नाही. यातून स्थानिक डॉक्‍टरांच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्‍टरांशी बोलून, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्षाचे विश्‍लेषण करून पुढील सल्ला देता येतो. त्यामुळे रुग्णाचा "फॉलोअप' वाढला असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT