Corona Updates sakal media
महाराष्ट्र बातम्या

मुंबईत कोरोनामुक्तांची संख्या अधिक; राज्यात चोवीस तासांत 4,205 रूग्णांची नोंद

राज्यात आज तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या चोवीस तासांत राज्यात 4,205 नव्या कोरोना (Corona News) बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 3,752 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या अधिक नोंदवली जात होता. मात्र, गेल्या 24 तासांत मुंबईत नव्या 1,898 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, 2253 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Maharashtra Corona Update News)

राज्यात आज तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून, राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर(Recovery Rate) 97.82 टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात 25 हजारांहून अधिक सक्रिय रूग्णांवर उपचार केले जात आहेत.

मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा दर 97 टक्क्यांवर

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या अधिक होती. मात्र, आज मुंबईत बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील रूग्ण बरे होण्याच्या दरामध्येदेखील वाढ नोंदवण्यात आली असून, येथे 97 टक्के रिकव्हरी रेट नोंदवला गेला आहे. मात्र, दुसरीकडे रुग्ण दुपटीचा दर वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत रूग्ण वाढीचा दर 386 दिवसांवर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT