Corona Test
Corona Test sakal
महाराष्ट्र

चिंता वाढली! राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1300 पार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यामध्ये 1,357 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांसाह प्रशासननाची चिंता वाढली आहे. आज 595 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील आहे. मुंबईत आज 889 रुग्णांची नोंद करण्यात आली असून, झाली आहे. राज्यात आज कोरोनामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी राज्यात 1,034 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. तर तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आज हा आकडा थेट 1,357 वर नोंदवण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के इतके झाले आहे. मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात सध्या 5, 888 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4, 294 इतके सक्रिय रुग्ण नोंदवण्यात आले आहे. त्या खालेखाल ठाण्यात 769 इतके सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मास्क वापरण्याचं आवाहन, सक्ती नाही; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

राज्यात काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती करण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होत. पण कोणत्याही प्रकारे मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. (appeal to use masks in the Maharashtra its not compulsory Health Minister Rajesh Tope explanation)

टोपे म्हणाले, आपल्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे. त्या संख्येमुळं केंद्रीय आरोग्य विभागानं आम्हाला एक पत्र पाठवलं की या जिल्ह्यांपुरत्या तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील.

राज्यातील कोरोनाचे केंद्राला टेन्शन; पत्राद्वारे दिल्या सूचना

दरम्यान, राज्यातील सहा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून या ठिकाणी टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा असा सल्ला केंद्राकडून राज्याला देण्यात आला आहे. याबाबत केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवून वरील सूचना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या अधिक या जिल्ह्यांनी राज्याच्या चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे वाढत्या रूग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये टेस्टिंग, लसीकरण वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना राज्याला देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवरदेखील बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

"निर्बंध नको असतील तर मास्क वापरा"; मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोकं वर काढले असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना पुन्हा निर्बंध नको असतील तर, स्वतःहून शिस्त पाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनी नागरिकांना केले आहे. वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी काल कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT