Corona 4th Wave Updates
Corona 4th Wave Updates सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर; 24 तासात हजारांहून अधिक बाधित

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोनाच्या कालच्या नवीन बाधितांच्या तुलनेत आज राज्यात नव्या बाधितांच्या संख्येमध्ये वाढ पाहण्यात मिळली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येने (Maharashtra Corona Update) एक हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारकडून सावध पावलं उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Maharashtra Corona Update)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात 1,080 नवे रुग्ण आढळून आले असून, एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही ही त्यातील दिलासादायक बाब आहे. तर 524 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्क्यांवर गेले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा असून, राज्यात सध्या 4 हजार 32 सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबईतील आकडेवारी वाढती

दरम्यान, एकीकडे राज्यात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना बाधित होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढताना दिसून येत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 739 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या चार हजार 32 इतकी झाली असून, सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहेत. मुंबईत 2970, ठाणे 452 आणि पुण्यात 357 सक्रीय रुग्ण आहेत. (Mumbai Corona Cases Update)

मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्क्यांवर; अलर्ट राहण्याच्या सूचना

मुंबईतदेखील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून, येथील रूग्ण बाधित होण्याचा दर 6 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे काहिशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील वाढता पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेता कोविड चाचण्या करण्याला गती दिली जाईल, असे मुंबई महापालिकेकडून (BMC Guideline On Corona) स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर शहरातील लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या युद्धपातळीवर वाढवण्याच्या सूचनांसह प्रयोगशाळा सुसज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या सूचना काय

  • वाढत्या पॉझिटिव्हिटी रेटनंतर मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या युद्धपातळीवर वाढवण्यात येणार आहे. तसेच टेस्टिंग लॅब आणि कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • १२ ते १८ वयोगटातील लसीकरण वाढवावे, तसेच बुस्टर डोसची संख्याही वाढवावी.

  • जंबो कोविड सेंटर पुन्हा सज्ज करावेत. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अलर्ट करावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT