corona patients.png 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोना वाढताच; मुंबईत बाधितांचे प्रमाण अधिक

चिंतेची बाब म्हणजे आज राज्यात नोंदवण्यात आलेल्या रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्ण एकट्या मुंबईतील आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख वाढताच असून, 24 तासांत राज्यात 2956 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 2165 जणांनी कोरोनावर मात केली असून, चार जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे आज राज्यात नोंदवण्यात आलेल्या 2656 रूग्णांपैकी 1724 रूग्ण एकट्या मुंबईतील आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Corona Update)

दरम्यान, राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचा प्रमाण 97.90 टक्के झाले असून मृत्यूदर 1.86 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. सध्या राज्यात 18,267 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली असून, यातील सर्वाधिक सक्रीय कोरोना बाधित हे मुंबईत नोंदवण्यात आले आहे. मुंबईत सध्या 11,813 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नुकत्यात आलेल्या NIV च्या रिपोर्टनुसार ठाण्यात बीए. 5 व्हेरियंटचे आणखी दोन रुग्ण आढळून आले असून, ते 28 आणि 30 मे रोजी संक्रमित आढळले होते. दिलासादायक बाब म्हणजे हे दोन्ही रूग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत.

देशात 6,594 रूग्णांची नोंद

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6594 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून, 4035 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 50 हजार 548 इतक्या सक्रीय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT