covid 19 covid 19
महाराष्ट्र बातम्या

Covid Update: राज्यात कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी; सक्रीय रूग्णांची संख्या ३ हजार पेक्षा जास्त

रुपेश नामदास

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्यानेवाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

तर कोरोनाच्या सक्रीय रूग्णांची संख्या ३०१६ येवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये १८४ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर रूग्ण बरं होण्याचा दर ९८.१४ टक्के येवढा आहे. रोज कोरोनांच्या रूग्णांमध्ये मोठी भर पडत असल्याने राज्यासाठी धोक्याची घंटा आहे.

दिल्लीव्यतिरिक्त महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रूग्ण असलेले जिल्हे आहेत. तर केरळच्या वायनाडमध्ये कोविड पॉझिटिव्ह दर 14.8% आहे, तर कोट्टायममध्ये 10.5% आहे. त्याचप्रमाणे सांगलीमध्ये 14.6% आणि पुण्यात 11.1% सकारात्मकता दर आहे. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात 10.7% सकारात्मकता दर आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नॅशनल कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितलं की, कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे, परंतु दिलासादायक बाब ही आहे की परिस्थिती इतकी बिघडलेली नाही. देशभरातील रुग्णालयांमध्ये अद्याप कोविड रुग्णांची गर्दी दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT