Corona Test Esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोना वाढतोय! 711 नव्या बाधितांची नोंद

राज्यात आज एकूण 3475 इतक्या सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट पाहण्यास मिळत होती. नव्या बाधितांची रूग्णसंख्या रोडावल्यामुळे अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. याशिवाय मास्क सक्तीदेखील मागे घेण्यात आली आहे. परंतु, आता राज्याच्या चिंतेत काहीशी भर टाकणारी आकडेवारी गेल्या 24 तासात समोर आली असून, राज्यात 24 तासात 711 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या 24 तासामध्ये एकूण 366 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात 3475 सक्रिय रुग्णांची नोंद

दरम्यान, राज्यात आज एकूण 3475 इतक्या सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 2526 रुग्ण हे मुंबईमध्ये असून, या खालोखाल ठाण्यामध्ये 413 कोरोनाचे सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना गेल्या 24 तासाच राज्यात केवळ एका कोरोना बाधिताच्या मृत्युची नोंद करण्यात आली असून, राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 77,35, 751 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्क्यांवर नोंदवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT