Coronavirus File photo
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : पश्चिम महाराष्ट्राने राज्याची चिंता वाढवली

नामदेव कुंभार

राज्यातील करोना महामारीचं संकट आटोक्यात येत असल्याचं दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं आढळून येत आहे. परिणामी राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ सुरू आहे. राज्यासाठी सकारात्मक आकडे समोर येत असले तरिही पश्चिम महाराष्ट्राने चिंता वाढवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपुरसारख्या मोठ्या शहरातील कोरोना आटोक्यात आला आहे. मात्र, कोल्हापूर, सांगली आणि सातरा येथील कोरोना रुग्णानं राज्याची चिंता वाढवली आहे.

मागील 24 तासांमध्ये राज्यभरात 14 हजार 347 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 9 हजार 798 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत याच कालावधीत 198 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्ताचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सुधारला आहे. पण पश्चिम महाराष्ट्राने मात्र चिंता वाढवली आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रात चार हजार 827 नवीन रुग्ण आढळले आहेत. पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर प्रत्येक विभागत कोरोना रुग्ण कमी झाले आहेत.

राज्याची विभागवार रुग्णसंख्या

पश्चिम महाराष्ट्र 4,827 (कालपेक्षा वाढ)

महामुंबई 2051 (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)

कोकण 944 (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)

उ. महाराष्ट्र 941 ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)

मराठवाडा 613 (कालपेक्षा वाढ)

विदर्भ 422 (कालपेक्षा घट)

एकूण रुग्ण 9 हजार 798 (कालपेक्षा 32 कमी)

राज्यात शुक्रवारपर्यंत एकूण 56,99,983 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.73% एवढे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT