corona_ 
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यात कोरोना रुग्ण संख्येत चढ-उतार कायम; दिवसभरात 132 जणांचा मृत्यू

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 28,699 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर 13,165 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 132 लोकांचा बळी गेला आहे. सोमवारी राज्यात 25 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले होते, तर रविवारी हा आकडा 30 हजारांच्या पुढे गेला होता. त्यामुळे रुग्णसंख्या कमी-जास्त होताना दिसतेय. राज्यात आतापर्यंत 25,33,026 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर  22,47,495  लोकांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 53,589 लोकांचा कोरोनाने बळी घेतलाय. सध्या राज्यात 2,30,641 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.  आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

२४ तासांत मिळाला दिलासा - 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सकाळी जारी केलेल्या नव्या आकडेवारीनं थोडाफार दिलासा दिला आहे. मागील २४ तासांत देशात ४० हजार ७१५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या1,16,86,796 झाली आहे. मागील २४ तासांत १९९ रुग्णांच्या मृत्यूसह देशातील एकूण मृत्यूची संख्या एक लाक ६० हजार १६६ इतकी झाली आहे.  

भारतामध्ये कोरोना महामारीची प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. दरदविशी कोरोना रुग्णांच्या संख्या नवा विक्रम प्रस्थापीत करत आहे. आरोग्य मंत्रायलानं मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनं थोडाफार दिलासा दिला. मात्र, सहा राज्यातील कोरोना रुग्णांची होणारी वाढ देशाची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू यासारख्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह सहा राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देशातील एकूण नव्या रुग्णांपैकी ८४ टक्के इतकी आहे.  या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लोकांच्या चिंतेत भर पडत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT