corona_pune
corona_pune 
महाराष्ट्र

Corona Update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 60 हजाराजवळ; मृत्यांच्या संख्येने चिंता वाढली

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत 59 हजार ९०७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ३० हजार २९६ लोकांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ३२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. मार्च महिन्याच्या शेवटापासून ही वाढ लक्षणीय आहे. राज्यात आतापर्यंत ३१ लाख ७३ हजार २६१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २६ लाख १३ हजार ६२७ लोकांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत ५६ हजार ६५२ लोकांचा बळी घेतला आहे. राज्यात सध्या ५ लाख १ हजार ५५९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती आणि असाध्य रोगाने ग्रासलेल्या 45 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. 1 एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला असून यात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व व्यक्तींना कोरोनाची लस दिली जात आहे. लसीकरण होत असलं तरी देशात कोरोना रुग्ण वाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे देशातील सरसकट नागरिकांना कोरोनाची लस देण्यात यावी. यात वयाचं मर्यादा असू नये अशी मागणी होतं आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SRH vs PBKS Live Score : पंजाबची 150 धावांपर्यत मजल; प्रभसिमरनला बाद करत व्यशकांतने दिला धक्का

SCROLL FOR NEXT