Sachin Waze Anil Deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

Sachin Waze: सचिन वाझेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, फडणवीसांना पत्र लिहून दिली माहिती, जयंत पाटलांचेही नाव

Sachin Waze allegations against Anil Deshmukh: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे, असं देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- तुरुंगात असलेले सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे, असं देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

तुरुंगात गेल्यानंतर सचिन वाझे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे द्यायचे. सी बीआयकडे या संदर्भातले पुरावे आहेत. मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहूनही या संदर्भात कळवलेले आहेत. या प्रकरणात माझी नार्को टेस्ट झाली तरी त्यासाठी मी तयार आहे. मी सर्व पुरावे दिलेले आहेत. सोबत मी जयंत पाटील यांचे नावही सांगितले आहे, असं ते म्हणाले आहेत.

सचिन वाझे यांच्या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदांमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण गाजत असतानाच सचिन वाझे यांना हा आरोप केला आहे. त्यामुळे याच्या टायमिंगबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये जयंत पाटील यांच्यासह इतर काही नेत्यांचे नाव असल्याचं देखील कळत आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर नेमके काय आरोप करण्यात आलेत, शिवाय इतर कोणत्या नेत्यांची नावे यात आहेत याबाबत पडदा कायम आहे. सदर पत्रामुळे राजकारणात खळबळ उडणार आहे हे नक्की. अद्याप हे पत्र हाती लागले नाही.

सदर प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, 'सर्व प्रकरणं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच येऊन कसे थांबतात? सर्व प्रकरणांचे तेच कसे केंद्रबिंदू असतात?'. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT