Shivai Electric Bus sakal
महाराष्ट्र बातम्या

Electric Bus : ५ हजार ई-बसेस एसटीच्या ताफ्यात येणार

वाढत्या इंधनाच्या दरामुळे एसटी महामंडळाला डिझेलवर एसटीची प्रवासी वाहतूक करणे आता तोट्याचे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाढत्या इंधनाच्या दरामुळे एसटी महामंडळाला डिझेलवर एसटीची प्रवासी वाहतूक करणे आता तोट्याचे झाले आहे.

मुंबई - वाढत्या इंधनाच्या दरामुळे एसटी महामंडळाला डिझेलवर एसटीची प्रवासी वाहतूक करणे आता तोट्याचे झाले आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात भविष्यात सर्वाधिक बसेस भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसेस दिसून येणार आहे. सुमारे ५ हजार इलेक्ट्रिक बसेसची निविदा प्रक्रिया एसटी प्रशासन राबवत असून, लवकरच शिवाई नावाने इलेक्ट्रिक बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दखल होणार आहे. या बसेसची निर्मिती सध्या सुरू असून, तयार झालेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसचा पहिला लूक पुढे आला आहे.

राज्य सरकारने इलेक्ट्रिक धोरणांतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय, महामंडळामध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणे एसटी महामंडळाने सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. सध्या स्थितीत डेपो स्तरावर उत्पंनापेक्षा डिझेलवरील खर्च अधिक वाढला आहे. अनेक डेपो स्तरावर डिझेलसाठी सुद्धा पैसे राहत नसल्याने अधिक फेऱ्या रद्द करण्याची महामंडळावर वेळ येत आहे.

परिणामी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे उत्तम पर्याय असून, राज्यभरात इलेक्ट्रिक शिवाई बसेस मधून सार्वजनिक प्रवासी वाहतूक करण्यात येणार आहे. सुरुवातीला १५० बसेस एसटीच्या ताफ्यात येणार असून या सर्व बसेस शिवनेरीच्या ठिकाणी चालवण्यात येणार आहे. तर त्यानंतर येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस शिवाई म्हणून येणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Smart Meter Protest: उरुळी कांचनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन, महावितरणला लेखी निवेदन

KDMC: केडीएमसी आयुक्तांची धडक कारवाई, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन; नेमके कारण काय?

"दोनशे लोकांचं जेवण आणि घाईघाईत बुकिंग", 'सीजेपी'च्या व्हायरल व्हिडीओवर हॉटेल व्यवस्थापनाची प्रतिक्रिया

Pakistan Cricket: आधी वेस्ट इंडिजने जिरवली, आता ICC ने कारवाई केली! पाकिस्तानच्या दोन गोलंदाजांना झाली शिक्षा...

SCROLL FOR NEXT