Eknath Shinde Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde: 'मविआ' नेत्यांची सुरक्षा कपात तर सहा मंत्र्यांना वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा

संतोष कानडे

मुंबईः राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. सहा मंत्र्यांच्या सुरक्षेतमध्ये वाढ करण्यात आलीय. या मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा देण्यात आली. महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा सरकारने नुकतीच काढून घेतली होती.

सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरविण्यत आलेली आहे.

हेही वाचा : कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

दरम्यान, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मविआच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, वरुण सरदेसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, नाना पटोले, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनिल केदारे, डेलकर कुटुंबीय, जयंत पाटील, संजय राऊत, सतेज पाटील आदी २७ जणांना समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Sleeper Bus Gang-Rape : दिल्ली हादरली ! धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपी अटकेत

Satara District Bank: सातारा जिल्हा बँकेचा आखाडा तापला! २५० ठरावांमुळे उदयनराजेंचे पारडे जड, राजेंची ताकद अन् दिग्गजांची अडचण

MBBS Success Story: परिस्थिती आडवी आली, पण जिद्द जिंकली! डोंगरदऱ्यांतून डॉक्टरकीच्या शिखरावर; साहिलच्या एमबीबीएस यशाची प्रेरणादायी कहाणी..

Marathi News Live Updates : गनिमी काव्याने मुंबईत घुसणार, मंत्र्यांना सळो की पळो करून सोडणार; मराठा बांधव आक्रमक

Mumbai High Court: पूर्वलक्षी प्रभावाने लादलेली भाडेवाढ रद्द, मुंबई बंदर प्राधिकरणाला दणका

SCROLL FOR NEXT