Strike Sakal media
महाराष्ट्र बातम्या

वीज कर्मचाऱ्यांचा २८, २९ मार्चला संपाचा इशारा

तेजस वाघमारे

मुंबई : महावितरण (MSEB), महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांमध्ये (Electricity company) सुरू करण्यात येत असलेले खासगीकरण, वरिष्ठ पदावरील भरती आणि बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेपाविरोधात महाराष्ट्र (Maharashtra) राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीने संपावर जाण्याचा इशारा (strike warning) दिला आहे. याबाबतची नोटीस समितीने तिन्ही वीज कंपन्यांच्या संचालकांना पाठविली आहे. यामुळे उन्हाळ्यात ग्राहकांना अडचणींना सामना करावा लागणार आहे.

राज्यातील वीज कंपन्यांतील कामगार संघटनांची सभा ९ फेब्रुवारी रोजी पनवेल येथे झाली. त्यात वीज कंपनीच्या कार्यपद्धती, राजकीय हस्तक्षेप, एकतर्फी निर्णयाबाबत असंतोष व्यक्त करण्यात आला.१६ आणि २५ फेब्रुवारी रोजी तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचारी अभियंते आणि अधिकारी राज्यभर द्वारसभा घेऊन खासगीकरणाचा निषेध करणार आहेत; तर २ मार्च रोजी अधिवेशनावर राज्यस्तरीय विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

२८ व २९ मार्च रोजी दोन दिवसांचा राज्यव्यापी संपाचा निर्णय झाला. त्यानुसार संघर्ष समितीतर्फे वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाला तीव्र आंदोलनाचे पत्र दिलेले असल्याचे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT