महाराष्ट्र बातम्या

शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू; चित्रविचीत्र, नक्षीकाम किंवा चित्र असलेले कपडे परिधान करण्यास मनाई

सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्त्वाची बातमी. शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने ड्रेसकोडचे निर्देश जाहीर केले आहेत. यामध्ये गडद आणि चित्रविचित्र कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबतच नक्षीकाम असलेले कपडे, जीन्स  आणि टीशर्ट घालून सरकारी ऑफिसमध्ये येण्यास आता बंदी घालण्यात आली आहे.

काय आहेत नवीन नियम, जाणून घेऊयात : 

पुरुषांसाठीचे नियम : 

  • शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी कामावर शर्ट, पॅन्ट आणि ट्राउझर परिधान करावी 
  • पुरुषांनी गडद रंगाचे, चित्रविचीत्र नक्षीकाम किंवा चित्र असलेले कपडे परिधान करू नये

महिलांसाठीचे  नियम : 

  • महिलांनी साडी, चुडीदार, सलवार, पॅन्ट किंवा ट्राउझर परिधान करावं, आवश्यकता असल्यास दुपट्टा वापरावा  
  • महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅंडल, बूट (शूज) सॅंडल याचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करू नये. 

दरम्यान सदर सूचना या सर्व राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच कंत्राटी तत्त्वावर कार्यालयात नियुक्त केले जाणारे कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती यांनाही लागू होणार आहे.  

सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चाांगल्या प्रतीच्या वर्तणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची सर्वसामान्य नागरिक अपेक्षा करतात. अशात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय किंवा गबाळी असल्यास त्याचा परिणाम एकंदर कामकाजावर देखील होतो. म्हणूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दैनंदिन पेहराव कसा असावा याबाबत सरकारकडून आता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  

maharashtra state government issued GR regarding dress code while working in mantralaya and government offices

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT