Rajesh Tope File Photo
महाराष्ट्र बातम्या

मृत्यूंचे आकडे लपवल्याचा आरोप सहन करणार नाही: राजेश टोपे

विनायक होगाडे

पुणे : कोरोनाची तिसरी लाट कधी येईल सांगता येत नाही, ती सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता असल्याचं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, नागरिक नियम पाळत नसल्यानं तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिसरी लाट येईल तेंव्हा येईल पण आम्ही तयार आहोत. मृत्यूचे आकडे लपवल्याचा आरोप हा धादांत खोटा आहे. हा आरोप सहन केला जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तिसरी लाट येऊ शकते अशी शक्यता असल्याचं मत नीती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी मांडलं होतं. काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तिसऱ्या लाटेच्या तयारीबाबत चर्चा झाली. ही बैठक त्यासंदर्भात घेतली गेली होती. युद्धाची तयारी असते तशी कोरोनाची तयारी करायला हवी. मात्र, मास्क न घालता होणारी गर्दी धोकादायक आहे, अशी भीती या बैठकीत व्यक्त केली गेली. ज्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे ती लाट अशा निष्काळजी वागण्याने अलिकडे येऊ शकते. लाट कधी येईल, यापेक्षा आम्ही तयारीत आहोत, हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या लाटेतही आम्ही तयारीत होतो आणि आताही आम्ही तयारीत आहोत.

मृत्यू लपवल्याचा आरोप असहनीय

महाराष्ट्राच्या बाबतीत मृत्यू लपवले हा आरोप मी सहन करणार नाही. असला प्रकार राज्यात कधीच झालेला नाहीये. मृत्यूचे आकडे लपवल्याचा आरोप सहन केला जाणार नाही. बऱ्याचदा प्रायव्हेट हॉस्पिटल्स मृत्यूचे आकडे अपलोड करायला उशीर करतात. त्यामुळे उशीर होऊ शकतो. एखाद्या वेळेस एखादा रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यात मृत झाला तर त्यावेळी उशीर होऊ शकतो. दिरंगाई होऊ शकते मात्र, लपवालपवी शक्य नाही. एकूण आतापर्यंत 4 ते 5 हजार मृत्यूची आकडेवारी अपलोड करायचे राहिलेले असू शकतात. मात्र मृत्यू लपवण्याचं काहीच कारण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT