Rain Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Updates: मराठवाडा विदर्भात पावसाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांना फटका

दत्ता लवांडे

Rain Updates: गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातलंय. राज्यातील अनेक भागांत गेल्या चार दिवसांत मुसळधार पाऊस बरसला असून काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. तर काल रात्री मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्याला पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.

(Maharashtra State Rain Latest Updates)

दरम्यान, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी आणि विदर्भातील हिंगोली, वाशिम, अकोल्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाया गेलेल्या पिकाला आणखी फटका बसला आहे. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

आज पावसाचा अंदाज

आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासहित विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - विरोधीपक्षनेते अजित पवार

राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मुख्यत्वे करून सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले असून परतीच्या पावसाने सुद्धा शेतकऱ्यांचा अंत पाहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवारांनी केली आहे. तर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही असं मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे आता सत्तारांवर टीकेची झोड उठू लागलीये.

दिवाळीत पावसाचे सावट दूर

हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या शनिवारपर्यंत (ता. २२) शहर व परिसरात सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असून, सोमवारपासून (ता. २४) आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनादिवशी पावसाची शक्यता नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT