maharashtra State Olympic Competition opening
maharashtra State Olympic Competition opening sakal
महाराष्ट्र

State Olympic Competition : खेळ संस्कृतीला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री

बाबा तारे

'राज्यात चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी सरकारने क्रिडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे.

औंध - 'राज्यात चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी सरकारने क्रिडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. खेळाच्या विकासासाठी आंतरराष्टीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक सरकारतर्फे देण्यात येतील व क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. यासाठी अनेक तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर क्रिडा संकुलांची नव्याने उभारणी करुन खेळ संस्कृतीला चालना देण्याचा ‌राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे" प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या वतीने महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित राज्य ऑलिंपिक स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते व महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, क्रिडा आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्य ऑलिंपिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर आदी उपस्थित होते.

'खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेवून राज्याचा नावलौकिक जगात उंचवावा आणि राज्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवावे. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध' असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तर 'क्रीडा संस्कृती वाढवणे, रुजवणे याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. राज्यात प्रत्येकाने एक तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे. खेळ वैयक्तिक पातळीवर निरोगी करत नाहीत तर समाजमन निकोप करण्यासाठी उपयुक्त होतात. देशी खेळांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू' असे अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राज्यात खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येईल. आपला खेळाडू देशासाठी-राज्यासाठी खेळतो. त्याचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासन घेईल.'

क्रीडा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, 'जोपर्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने खेळ खेळला जात नाही तोपर्यंत पदके प्राप्त करता येणार नाहीत. त्यासोबत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आधुनिक खेळ हा कौशल्य आणि क्षमतेवर आधारित आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच हे कौशल्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

'ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर ३९ खेळांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला असून, त्यापैकी ७ खेळांचा प्रथमच समावेश होत आहे. राज्यातील ८ जिल्ह्यात विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे' क्रिडा आयुक्त सुहास दिवसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.

सरकारने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले असून, राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार केला जात आहे. यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत मिळेल. १५५ क्रीडा संकुल राज्यात असून त्यात आणखी १२२ संकुलांची भर घालण्यात येणर आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी खेळाडुंच्या बक्षीसाच्या रकमेत पाचपट वाढ केली आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या ठाण्याच्या रुद्रांश पाटील याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT