ST Bus Employee sakal media
महाराष्ट्र बातम्या

ST चे 918 कर्मचारी निलंबित, राज्य सरकारची मोठी कारवाई

ओमकार वाबळे

महाराष्ट्र राज्य परिवहनच्या 918 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. दिवाळीच्या आधीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला आहे. ऐन दिवाळीत आंदोलन तीव्र करण्यात आल्याने सर्वसामान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केल्यानंतरही हा संप सुरू ठेवण्यात आल्याने सरकारने 918 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलंय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज ​​13 वा दिवस आहे. कालही काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर आजही महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 250 बस आगार बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने खासगी बसेसला फलाटांवर प्रवासी भरण्याची परवानगी दिली आहे.

एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभरात संप पुकारण्यात आल्याने ऐन दिवाळीच्या वेळी एसटी आगारात उभ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT