Summer Temperature esakal
महाराष्ट्र बातम्या

Summer Heat : उष्णतेच्या लाटेचा इशारा; राज्यातील तापमानात होणार वाढ

वादळी पावसाने राज्यातून निरोप घेताच उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. राज्याच्या अनेक ठिकाणी पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वादळी पावसाने राज्यातून निरोप घेताच उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. राज्याच्या अनेक ठिकाणी पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे.

पुणे - राज्यात उन्हाचा ताप अधिक तीव्र होणार आहे. पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचे अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर शुक्रवारी (ता. १२) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

वादळी पावसाने राज्यातून निरोप घेताच उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. राज्याच्या अनेक ठिकाणी पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. गुरुवारी (ता. ११) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव येथे ४४.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. दरम्यान उन्हाळी हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे.

तर राज्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशापार गेला असेल आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशापेक्षा अधिक वाढ झाली असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उष्ण लाट आली होती. अकोला येथे ४३.५, धुळे ४२.० सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात सक्रिय चक्रीवादळाच्या लगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात सध्या कोरड्या हवामानाची स्थिती असून शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात 'मोखा' चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून गुरुवारी (ता. ११) त्याचे ‘मोखा’ चक्रीवादळ चक्रीवादळात रूपांतर झाले. ही वादळी प्रणाली बांगलादेश, म्यानमारच्या दिशेने जात असून याची तीव्रता अजून वाढत ते रविवारपर्यंत (ता. १४) किनारपट्टीला धडकण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान याचा राज्यावर परिणाम जाणवणार नाही.

चक्रीवादळाला 'मोखा' हे नाव येमेन या देशाने दिले आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अंदमान निकोबार बोटसमुह त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT