Talathi Bharti  sakal
महाराष्ट्र बातम्या

Talathi Recruitment : ४ हजार ६४४ जागांसाठी तब्बल १० लाख अर्ज!

राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील ही मोठी भरती आहे.

सम्राट कदम

पुणे - राज्यातील ४ हजार ६४४ पदांच्या तलाठी भरतीसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यातील पुणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक म्हणजे एक लाख १४ हजार ६८४ उमेदवारांनी तर सर्वात कमी अर्ज वाशीम जिल्ह्यासाठी दोन हजार ६३६ उमेदवारांनी अर्ज केले आहे.

गंमत म्हणजे शुल्कापोटी सरकार अथवा कंपनीकडे १० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील ही मोठी भरती आहे. पुण्यातील भूमि अभिलेख कार्यालयातील जमावबंदी आयुक्त आणि संचालक यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतीच जिल्हानिहाय अर्जदारांची संख्या घोषित करण्यात आली आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून, १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत १९ दिवस तीन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.राज्य सरकारच्या विविध भरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणाने वादात सापडत आहे.

अशा स्थितीत तब्बल चार हजार पदांची ही भरती राज्यभरातील उमेदवारांसाठी आशेचा किरण आहे. राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणारे उमेदवारही यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर उतरले आहे.

निवडक जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या -

  • अहमदनगर - ६१,६३३

  • छत्रपती संभाजीनगर - ३२०८४

  • बीड - ४८७७२

  • जळगाव - ४८३३६

  • नागपूर - ५७८७२

  • नाशिक - ६८०३८

  • पुणे - ११४६८४

  • रायगड - १००५३७

  • सोलापूर - ५८९७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT