Recruitment esakal
महाराष्ट्र बातम्या

Talathi Recruitment : राज्यातील तलाठी भरतीच्या चौकशीची मागणी

राज्यातील २०१९ मधील तलाठी पदभरतीच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील २०१९ मधील तलाठी पदभरतीच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महसुल विभागाने याची चौकशी करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे एक हजार ८०९ पदांसाठी अर्ज मागवून घेण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंबंधी मागणी करण्यात आल्याचे समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. समिती म्हणते, ‘२०१९ तलाठी पदभरतीचा निकाल लागल्यानंतर ही नोकर भरती पारदर्शक पद्धतीने झाली नसल्याच्या तक्रारी उमेदवारांनी राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात केल्या होत्या. पण फक्त अहमदनगर जिल्हाधिकायांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली.

अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्थानिक पातळीवर तलाठी पदभरतीचा तपास करून या नोकर भरतीत झालेला भ्रष्टाचार समोर आणला. या तपासाचा अहवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने माहितीच्या अधिकारात मागवून घेतला होता.’

समितीच्या प्रमुख मागण्या -

- अहमदनगर प्रमाणेच सर्व जिल्ह्यातील तलाठी उमेदवारांची नव्याने पडताळणी करावी

- महसूल विभागामार्फत या गैरप्रकारांची अधिकृत तक्रार पोलीस विभागात नोंद व्हावी

- निवृत्त किंवा कार्यरत न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमन्यात यावी

- महसूल आणि महा-आयटी मधील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

Satara Ganpati Visarjan Video : भगवान शंकराची कृपा? मामाच्या डोक्यावर सुरक्षित नाचतो गणपती! पाहा अद्भुत क्षण

Latest Maharashtra News Updates : त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी सरकारकडून समिती सदस्यांची नियुक्ती

TET Exam : टीईटी बंधनकारक, प्रमोशन नाहीच; सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश

Chandra Gochar 2025: 7 सप्टेंबरपासून 'या' राशीचे नशीब बदलेल, आर्थिक संकटातून मिळेल मुक्तता

SCROLL FOR NEXT