महाराष्ट्र

दुकानाच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढणार, पण... - मुख्यमंत्री

नामदेव कुंभार

Maharashtra Lockdown Update: ज्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तिथे दुकानाच्या वेळा रात्री 8 वाजेपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. निर्बंधाबाबत आज, सायंकाळी निर्णय जाहीर करु, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली येथे सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी निर्बंध शिथिल होणार असल्याचे सांगितलं. तसेच, जिथे रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे कठोर निर्णय घेतले जातील, असेही सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. लोकलमध्ये तूर्तास सर्वांना प्रवेश देणं शक्य नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पुढील टप्प्यात लोकलमध्ये सर्वांना प्रवेश देण्यावर विचार केला जाईल.

पुढील काही दिवसांत निर्बंध शिथिल केले तर रस्त्यावर उतरु असा इशारा व्यापारी संघटनेनं दिला आहे, या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की अशा धमक्यांना मी घाबरत नाही. लोकांची सुरक्षा माझ्यासाठी महत्वाची आहे. जीव वाचवण्याचा वेळ येते तेव्हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन तयार होत नाही. ती चिंता आम्हाला कारावी लागते. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने दिलेल्या सुचेनेनुसार कोरोनाचे नियम पाळावे लागतील.

जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले तरी मी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जी जी जबाबदारी पार पाडावी लागेल ती ती जबाबदारी पार पाडू असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

नैसर्गिक संकटाचं स्वरुप आता भीषण होत चाललेय

कमी कालावधीत जास्त पाऊस कोसळल्यामुळे संकट ओढावलं

आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करण्याचं काम सुरु केलं आहे

निसर्गासमोर आपण हतबल

काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील

काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी सहकार्य करावे

पुराचं पाणी नेमकं कसं वळवायचं, याचं नियोजन करावं लागेल

लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश

पुरांचा सामना करण्यासाठी फ्लड मॅनेजमेंट

केंद्राकडून तीन गोष्टींची आवश्यकता

एनडीआरएफचे विकष बदलणं गरजेचं

नवीन कर्ज घेतना कमी व्याजदराने द्यावे

व्यापाऱ्यांनी कमी व्याजदरात कर्ज मिळायला हवं.

NDRF चे निकष कालबाह्य झाले आहेत. त्यात केंद्राने सुधारणा करण्याची गरज

पूर असलेल्या परस्थिती कोरोना चाचणीचं प्रमाण वाढवण्याचं जिल्हा प्रशासनाला आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT