महाराष्ट्र

मतमोजणी सुरू; दिग्गजांची धाकधूक वाढली | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालातून आजी-माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली आहे. काही अपवाद वगळता यापैकी सर्व "आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील माजी मंत्री नशीब अजमावत आहेत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील सुरक्षित कोथरूड मतदारसंघ निवडल्याने सुरवातीला त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता, त्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष आहे. 

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उतरविल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरली आहे. 

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील लढत मराठवाड्यासह राज्यासाठी लक्षवेधी ठरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने वरळी मतदारसंघाचा निकाल औत्सुक्‍याचा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT