BJP-Shivsena-MNS
BJP-Shivsena-MNS 
महाराष्ट्र

Vidhansabha 2019 : मुंबईत खलबतांचा माहोल

सकाळ न्यूज नेटवर्क

भाजप, शिवसेना आणि मनसेचा बैठकांचा सिलसिला
मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही तासांचाच अवधी शिल्लक असताना राज्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी भाजपच्या निवडणुक समितीचा बैठक पार पडली असून, या बैठकीत राज्यातील भाजपची परिस्थिती आणि युतीबाबत चर्चा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसनेचे मंत्री आणि अन्य नेत्यांची शिवसेना भवन येथे बैठक पार पडली.

यात भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेण्यात आला. ईव्हीएम मशिनच्या मुद्यावर कालपर्यंत निवडणुका न लढविण्याच्या मानसिकतेत असलेल्या ‘मनसे’ने आज पदाधिकाऱ्यांची  बैठक घेऊन काही जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या आघाडीची आज होणारी बैठक रद्द झाली असली, तरी येत्या २५ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांची जागावाटपावर गुरुवारी रात्री उशिरा ‘वर्षा’वर चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार, शिवसेना १२६, तर भाजप आणि मित्रपक्षांना १६२ जागा असा प्रस्ताव भाजपने दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ठरलेला हा फॉर्म्युला जवळपास निश्‍चित मानला जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा २२ तारखेला मुंबईत येणार आहेत. त्या वेळी या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

काँग्रेस आघाडीतील घटकपक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत होणारी बैठक रद्द करण्यात आली, आता ही बैठक २५ सप्टेंबर रोजी होईल. घटकपक्षांचे समन्वयक राजू शेट्टी मुंबईत नसल्याने ही बैठक झाली नाही. मात्र या घटकपक्षांनी आपला प्रस्ताव काँग्रेसकडे दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT