Shivsena-Bjp
Shivsena-Bjp 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : कोण कुणाचे किती पाडतो; भाजप-सेनेत रस्सीखेच

मृणालिनी नानिवडेकर

विधानसभा 2019 : मुंबई - भाजप आणि शिवसेनेत परस्परांचे उमेदवार जिंकून आमदार होऊ नयेत यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. भाजप लढत असलेल्या मतदारसंघात जायचे नाही या अलिखित नियमाला झुगारत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैत्रीपूर्ण लढतीच्या कणकवली मतदारसंघात दाखल होत आहेत, तर ते तेथे जात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून नीतेश राणेंच्या प्रचारासाठी कोकणात दाखल होणार आहेत. नारायण राणे हा युतीतील वादाचा मुद्दा असला तरी अन्य ठिकाणीही परस्परांना पाडण्याची अंतर्गत स्पर्धा सुरू झाली असून, सहकारी पक्षाचे विजयी आमदार कमी व्हावेत यासाठी आडून आडून प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपची विजययात्रा 120च्या आत थांबावी आणि शिवसेनेची संख्या डोईजड होऊ नये यासाठी उभय पक्षांनी समसमान कार्यक्रमाचा अवलंब केला आहे. 

विजयरथ पंक्‍चर होणार? 
भाजप जिंकू शकेल अशा तब्बल 15 मतदारसंघांत शिवसेनेचे बंडखोर विजयरथ पंक्‍चर करण्याच्या कामी लागले आहेत, तर शिवसेना लढवत असलेल्या पाच मतदारसंघांत भाजपचे बंडखोर मैदानात उतरले आहेत. भाजपने मित्रपक्षांना दिलेल्या गोवंडी या मुंबईतील मतदारसंघात गौतम सोनावणे यांचा अर्ज शिवसेनेने भरू दिला नाही, हे रिपब्लिकन पक्षाचे दुःख ताजे आहे. त्यातच शिवसंग्रामच्या कोट्यातील वर्सोवा मतदारसंघात विनायक मेटे यांच्या निकटच्या सहकारी विद्यमान आमदार भारती लवेकर यांना सेनेच्या झुंजार नेत्या राजूल पटेल यांनी आव्हान दिले आहे. 

राऊतांच्या भेटीची दखल 
शेजारच्याच अंधेरी पूर्व या शिवसेनेच्या रमेश लटके यांच्या मतदारसंघात भाजपच्या संपर्कात असलेल्या मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेने आमचे उमेदवार लढत असलेल्या 15 मतदारसंघांत बंडखोर उभे केले आहेत अशी भाजपची तक्रार आहे. पिंपरी चिंचवड, माण, कणकवली, नागपूर दक्षिण या मतदारसंघांबद्दल व्यक्‍त केलेली नाराजी शिवसेनेने दखलपात्रही मानलेली नाही. नाशिक परिसरात भाजप आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत त्यांच्या भेटीला गेले, याची दखल आम्ही घेतली असल्याचे भाजपने नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT