Narendra-Modi
Narendra-Modi 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : मोदींचा तोफखाना धडाडला

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारसभांनी आज महाराष्ट्राचा राजकीय अवकाश ढवळून काढला. अकोल्यातील पहिल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३७० व्या कलमाचा मुद्दा उपस्थित करताना विरोधकांना धारेवर धरले, तर जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत मराठवाड्याचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असणाऱ्या दुष्काळाच्या मुद्‌द्‌याला स्पर्श केला. पुढे मुंबईतील सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत नरेंद्र आणि देवेंद्र म्हणजे एकावर एक अकरा आहेत, असेही ते म्हणाले.

‘लॅंड माफियांना साफ करणार’
नवी मुंबई - बांधकाम क्षेत्र हे घरनिर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे राहत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू, असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गैरव्यवहार करणाऱ्या बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी घरे, किनारपट्टीचा विकास, मच्छीमारांसाठी केंद्रात स्वतंत्र विभाग आदी सामान्यांच्या मुद्द्याला मोदी यांनी  हात घालत पुन्हा विकास करणारे सरकार निवडून द्या, असे आवाहन केले. डोंबिवली, ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेण येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी खारघर येथे आयोजित सभेत मोदी बोलत होते. 

रेरा कायद्यावर बोलताना मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. स्वतःची दुकाने बंद पडणार असल्याने रेरा कायद्याच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. २०१४ च्या आधी बांधकाम क्षेत्रातील बिल्डर आणि अंडरवर्ल्डच्या गुंडांचे संबंध सर्वांना माहीत होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे काळे डाग धुण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे टीकास्त्र मोदींनी आघाडी सरकारवर डागले. ग्राहक आणि शेतकरी यांच्यासोबत जो विकासक प्रामाणिक राहील, त्याच्यापाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील, असे आश्‍वासन मोदी यांनी या वेळी विकासकांना दिले.

महाराष्ट्रात कलम ३७० चे काय काम, असा प्रश्‍न करणाऱ्यांना या राज्यातील जवानांचे बलिदान दिसत नाही. बॉम्बस्फोट घडवून महाराष्ट्राला रक्तरंजित करणारे देश सोडून गेले.
(अकोला येथील सभेत)

 महाराष्ट्रात प्रत्येक कामामध्ये काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ची भागीदारी आहे. मराठवाड्याच्या नावावर अनेक योजना घेतल्या; परंतु त्यांचा वापर जनतेसाठी करण्यात आला नाही.
(परतूर येथील सभेत)

दिल्लीत ज्याप्रमाणे तुम्ही नरेंद्रला बसवलेत, त्याप्रमाणे मुंबईत देवेंद्रला बसवा, फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार. नरेंद्र आणि देवेंद्र हा फॉर्म्युला प्रगतीसाठी सुपहिट ठरला आहे.
(मुंबईतील सभेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT