Survey 
महाराष्ट्र बातम्या

Vidhansabha 2019 : ताज्या सर्वेक्षणाचा कौल भाजपच्या बाजूने

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी केलेल्या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार सत्ताधारी भाजप- शिवसेनेची युती पुन्हा सत्तेवर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

झी २४ तास आणि एबीपी माझा - सी व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला राज्यात पुन्हा मोठे यश मिळू शकते, असे चित्र आहे. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यास त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

एबीपी माझा - सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार युती न झाल्यास भाजप १४४ जागांसह स्वबळावर सत्तेवर येऊ शकतो, तर अशा स्थितीत शिवसेनेला अवघ्या ३९ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे दिसते. भाजप व शिवसेनेची युती झाल्यास २०५ जागांसह सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे दिसते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळीही विरोधी बाकांवरच बसावे लागणार असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची शक्‍यता असून, या पक्षाचा विधानसभेत प्रवेश होऊ शकतो, असे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT