Vidarbha
Vidarbha 
महाराष्ट्र

Vidhansabha 2019 : विदर्भ : भाजपची स्पर्धा स्वत:शीच !

अनंत कोळमकर

विधानसभा 2019 : विदर्भात २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती नसतानाही ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वगळता अन्य नऊ ठिकाणी भाजप-शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत पन्नासपेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रांत भाजप-शिवसेनेने आघाडी घेतली. अशा अनुकूल परिस्थितीत विरोधी पक्षाचे फारसे तगडे आव्हान नसताना विदर्भात आपली शक्ती कायम राखण्यासाठी भाजपची स्वतःशीच स्पर्धा आहे.

मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि ऊर्जामंत्री ही तीन प्रमुख मंत्रिपदे असलेल्या विदर्भात गेल्या वेळची ताकद दाखविण्याचेच आव्हान भाजपसमोर असेल.
मागील निवडणुकीत काँग्रेस दहा जागांवर घसरली, तर राष्ट्रवादीला एकाच जागेवर व शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले. विदर्भात सतत सुरू असलेली घसरण रोखण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने विदर्भाकडे होती. त्याचा फायदा काँग्रेसला होईल की नाही, हे या निवडणुकीत दिसेल. राष्ट्रवादीची जी काही थोडीफार शक्ती विदर्भात होती, ती गेल्या निवडणुकीतील मोदी लाटेत पार धुऊन निघाली. ती पुन्हा दाखवण्याची संधी या निवडणुकीत राष्ट्रवादीला आहे. तशीच शिवसेनेलाही आहे.

संघटनात्मक बांधणीचा विचार केला तर भाजप सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गलितगात्र अवस्थेत आहेत. संपूर्ण विदर्भात ‘अपील’ असेल असा नेता काँग्रेसकडे नाही. 

प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलडाणा हे तीन जिल्हे वगळता अन्यत्र निवडून येऊ शकत नसला तरी, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याची शक्ती ते घेणाऱ्या मतांमध्ये आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या या निवडणुकीतील भूमिकेबाबत उत्कंठा आहे. या निवडणुकीत विदर्भातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, भाजपचे मदन येरावार, डॉ. संजय कुटे, चैनसुख संचेती, राजे अंबरीशराव आत्राम, शिवसेनेचे संजय राठोड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, नितीन राऊत, नाना पटोले, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, मनोहर नाईक, राजेंद्र शिंगणे, स्वतंत्र लढणारे बच्चू कडू, रवी राणा यांचे भविष्य पणाला लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT