Maharashtra Violent clash between 2 groups in Akola Section 144 imposed  
महाराष्ट्र बातम्या

Akola: अकोल्यात रात्री दोन गटात राडा; दगडफेक जाळपोळ, दोन जण जखमी

अकोलामध्ये रात्री दोन गटांत दंगल झाल्याची धक्कादायक घटना घडली.

धनश्री ओतारी

अकोलामध्ये रात्री दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही गटांमध्ये राडा झाला. या घटनेत एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. या हिंसाचाराचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन गटातील लोक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. यासोबतच ते वाहनांची तोडफोड करून गोंधळ घालत आहेत. (Latest Marathi News)

जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात दोन गटांत शनिवारी रात्री ११:१५ वाजताच्या सुमारास वाद झाल्याने त्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर काही लोकांचा जमाव तेथील घरांवर चालून गेला. यावेळी एक गटाने तुफान दगडफेक करीत मोटारसायकलींचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, तर काही समाजकंटकांनी एक घर पेटवून दिले. या घटनेत एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. (Latest Maharashtra News)

मिळालेल्या माहितीनुसार, एका सोशल मीडिया ग्रुपवर एक पोस्ट आली. त्यामुळे वाद झाला आणि शेकडो लोक रस्त्यावर उतरले या लोकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी बाईक, गाड्या आणि दिसेल त्या ठिकाणी आगी लावत प्रचंड जाळपोळ केली. त्यामुळे अकोल्यात अधिकच तणाव पेटला. रात्री उशिरा हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Maharashtra News)

तसेच, हा राडा सुरू असतानाच 100 हून अधिक बाईकस्वारांनी अकोल्यात फेरफटका मारत दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोक अधिक भयभीत झाले. बाईकस्वारांचा ताफा पाहून अजून दगडफेक सुरू झाली.

शहरातील या राड्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संवेदनशील भागात अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. अमरावतीतून एसआरपीची तुकडी मागवली असून परिसरावर नजर ठेवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT