rain Maharashtra Weather forecast sakal
महाराष्ट्र बातम्या

ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसणार, हवामान खात्याचा 'या' राज्यांना अलर्ट

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मागील आठवड्यापासून थंडीची लाट सुरू आहे. उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतायेत. महाराष्ट्रातील जवळपास १६ जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली गेलं होतं. पण आता ऐन थंडीत राज्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत. आजपासून राज्यात थंडीचा नवा टप्पा सुरू होणार आहे. त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)

पश्चिमी चक्रवातामुळे (Western Disturbances) राज्यात गारठा वाढला आहे. सलग पाचव्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे. गेल्या २४ तासांत अनेक भागांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड इथं थंडीची लाट होती. मात्र, आता काही ठिकाणी लाट ओसरणार आहे. (Cold Wave in Maharashtra)

हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवा अलर्ट जारी केला आहे. यामध्ये फक्त तापमानात घट होणार नाही, तर २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊसही पडू शकतो असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यांना पावसाचा इशारा कायम

उत्तर-पश्चिम भारतात पुढचे चार दिवस ताशी 10-20 कि.मी. वेगाने वारे वाहतील. यामुळे या भागात तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने खाली येऊ शकतं. मध्य प्रदेशातील काही भागात थंडीची लाट कायम राहील. याशिवाय छत्तीसगड आणि विदर्भातही तापमानात घट नोंदवली जाईल. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup : एका राजाने निवडला संघ... खेळाडूंवरील गुन्हे माफ अन् इंग्लिश तेल कंपनी बंद पाडण्याची धमकी; १९३० च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा तुम्ही ऐकला नसेल...

Donald Trump Team Split: इराण करारावरून ट्रम्प यांच्या प्रशासनात फूट; सीआयएच्या गुप्त अहवालामुळे अमेरिकेची उडाली झोप

Broiler Chickens Death : एका रात्रीत पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यु; सुमारे सात लाखाचे नुकसान, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Jawan Pravin Avhade : कन्यारत्नाच्या आनंदावर विरजण; जवान प्रवीण आव्हाड यांचे अपघाती निधन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेच्या २४ उमेदवारांना नोटीस, निवडणुकीचा हिशोब न दिल्याने कारवाई

SCROLL FOR NEXT