Maharashtra Rain Update: आजही बरसणार परतीचा पाऊस, मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update: आजही बरसणार परतीचा पाऊस, मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Mumbai Thane Pune Kokan Marathwada Rain updates from Maharashtra in marathi : दुसरीकडे मराठवाड्यामध्ये ही चांगलाच पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai RAin Update: गेल्या दोन दिवसापासून मुंबईसह राज्यामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. पावसाने सुरू केलेल्या या बॅटिंगमुळे कोकण, पुणे, रायगड, मुंबई हे जिल्हे पावसामुळे झोडपून निघाले आहेत. तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये ही चांगलाच पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

अशावेळी आजही संपूर्ण राज्यात परतीचा जोरदार पाऊस बरसणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Beed, Parbhani, Hingoli, Buldhana, Akola, Amravati, Washim, Yavatmal, Wardha, Nagpur, Bhandara, Gondia and Chandrapur)

तर दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती, संभाजीनगर व जालना या जिल्ह्यांमध्ये ही जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.(Ratnagiri, Sindhudurg, Jalgaon, Nagar, Satara, Kolhapur, Chhatrapati, Sambhajinagar and Jalna)

हवामान खात्याने आज सकाळी मुंबईमध्ये अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे

दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड, पालघर जिल्ह्यांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, नाशिक व पुणे या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर मध्यमहाराष्ट्र, उत्तर मराठवाडा या ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याचा असून विदर्भामध्ये ही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT