Weather Update News esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आजही काही जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यात आजही काही जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आज सिंधुदूर्गला अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, नागपूरसह विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2 दिवसात कोकण आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा जोर अधिक राहील, असा अंदाज आहे.

हवामान विभागाने मुंबईसह उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्याता आहे. आगामी काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातून दिनांक ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण गोवा येथे पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT