imd sakal media
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : मोठा दिलासा! पावसाचा परतीचा प्रवास अखेर संपला

राज्यासह संपूर्ण देशाचा निरोप घेत मॉन्सून बाहेर पडला

अक्षता पवार

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) यंदाचा परतीचा प्रवास अखेर संपला. राज्यासह संपूर्ण देशाचा निरोप घेत मॉन्सून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता दक्षिण भारतातील राज्यात ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला सुरवात झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.यंदा वेळे आधीच मॉन्सूनने देशात आगमन केले होते. या वर्षी मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या तीनदिवस आधी म्हणजेच २९ मे रोजी केरळात दाखल झाला. त्यानंतर आपला प्रवास सुरू ठेवत मॉन्सूनने १६ जून दरम्यान महाराष्ट्र तर २ जुलै रोजी संपूर्ण देशाला व्यापले.

त्यात १ जून ते २० सप्टेंबर या कालावधीत देशात ९२५ मिलिमीटर इतका पाऊस पडला. हा सरासरीपेक्षा ६ टक्के जास्त नोंदला गेला. महाराष्ट्रात ही सरासरीपेक्षा २३ टक्के अधिक (१२१९.७) पावसाची नोंद या वर्षी झाली. मॉन्सूनचे यंदाचे वर्ष देशासाठी चांगले ठरले. देशात २९ मे रोजी आगमन केलेल्या मॉन्सूनने यंदा आपला ४ महिने आणि २५ दिवसांचा मुक्काम पूर्ण केला.

तर हंगामातील सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण करत मॉन्सूनने वायव्य भारतातून २० सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला सुरवात केली. त्यानंतर थांबत-थांबत परतीचा प्रवास होत होता. अखेर रविवारी मॉन्सून देशातून परतला.

ऑक्टोबरमध्ये धुव्वाधार

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असताना मॉन्सूने राज्यात धुव्वाधार बॅटींग केली. कोकण, मध्य महाराष्ट्रात तर मुसळधार पावसाची नोंद झाली. दरम्यान १ ते २३ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सरासरीपेक्षा १०२ टक्के अधिक पाऊस पडला. राज्यात या कालावधीत १३२.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात ही पावसाने धुमाकूळ घातला होता. ऑक्टोबर महिन्यात रविवारपर्यंत (ता. २३)जिल्ह्यात १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात रविवारपर्यंत १७१.५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

संपूर्ण देशातून बाहेर पडलेल्या मॉन्सूनची मागील तीन वर्षातील स्थिती

वर्ष : तारीख

२०२२ - २३ ऑक्टोबर

२०२१ - २५ ऑक्टोबर

२०२० - २८ ऑक्टोबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT