Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात पाच दिवस गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा

वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

सध्या राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. तसेच फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. यामध्ये द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात पुढचे पाच दिवस गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट, तर कोकण आणि विदर्भात पावसाची थोडीसी उघडीप राहील. राज्यात 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विजांचा कडकडाट, वादळी वार्‍यामुळे गारपीट आणि पाऊस पडत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस जास्त आहे. कोकणात पडत असलेला पाऊस थोडासा कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-विदर्भात 2-3 दिवस पावसाची उघडीप असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT